राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी किरण शिखरे

येणाऱ्या काळामध्ये कोकण विभागाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत पक्ष संघटना वाढीकरिता प्रयत्न करणार

कल्याण : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी कल्याण मधील किरण शिखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान, राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते हि नियुक्तीपत्र देण्यात आले.
       राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून २०१० मध्ये वार्ड अध्यक्ष पदापासून किरण शिखरे यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर प्रभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा अध्यक्ष व ही सर्व कामगिरी पाहता राष्ट्रीय सरचिटणीस अशी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळाली. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आणि मला विद्यार्थ्यांपर्यंत राज्यपातळीवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान, प्रदेश अध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांचे आणि सर्व मान्यवर पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया किरण शिखरे यांनी दिली.
तसेच येणाऱ्या काळामध्ये कोकण विभागाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत पक्ष संघटना वाढीकरिता जिथे-जिथे आवश्यक असेल तिथे-तिथे जाऊन निश्चितपने मदत, सहकार्य करेन,प्रश्न समजून घेईन आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख व युवक प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते. 

 453 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.